|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ईद-ए-मिलाद सण ऐक्याचे प्रतीक

ईद-ए-मिलाद सण ऐक्याचे प्रतीक 

निपाणी / वार्ताहर

 निपाणी, चिकोडी, संकेश्वर परिसरात शनिवारी ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक दर्शविताना तमाम मुस्लीम बांधवांना हिंदू बांधवांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. ईद-ए-मिलाद हा उत्सव साजरा करताना मुस्लीम बांधवांनी अनेक उपक्रम राबविले. सामाजिक बांधिलकी जपताना रुग्णालयामध्ये फळांचे वाटप केले. तसेच काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.

 निपाणी शहरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्यात आला. काही ठिकाणी शुभेच्छा देताना खिरीचे वाटप करण्यात आले. निपाणीत हजरत ख्वाँजा गलीब नवाज वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने ईद-ए-मिलाद साजरी करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वेल्फेअर संघाच्यावतीने सकाळी गौसपाकची चादर चढविण्यात आली. यानंतर दुपारी महात्मा गांधी रुग्णालय व लाफायट रुग्णालय याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी हफीज अलीमहुसेन बुखारी, मुन्ना कोच्चरगी, समिर पठाण, शहाबाज पठाण यांच्यासह वेल्फेअर संघाचे अध्यक्ष जमीर गवंडी, उपाध्यक्ष चाँदसाब दर्गाह, तौसीफ चाऊस, अल्ताफ सौदागर, अरिफ मकानदार, शाद गवंडी, समिर शेखबडे, सुरज सय्यद, इरफान चाऊस, अस्लम पठाण, मकसुद सकवास, बबलू पठाण, जाफर शेख, नाविद पठाण आदी उपस्थित होते.

शहरातून मिरवणूक

येथील मुस्लीम समाज बांधवांतर्फे शनिवारी ईद-ए-मिलाद सणानिमित्त मोहम्मद पैगंबर जन्म दिनानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. येथील झारी गल्लीतून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादी तसेच चिकोडीचे सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

संकेश्वरात ईद-ए-मिलाद सण साजरा

 संकेश्वर :  ईद-ए-मिलादनिमित्त यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लीम समाजबांधव मोठय़ासंख्येने सहभागी झाले होते. जुम्मा मशिदी येथून सकाळी 10 वाजता नमाज अदा करुन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक विविध वाद्याच्या गजरात जुम्मा मशिद, गांधी चौक, रंगाची चावडी, सुभाष रोड, कमतनूर वेस, सुसंध्दी गल्ली, मड्डी गल्ली, पीबीरोडमार्गे मार्केटयार्डात पोहचली. त्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. प्रमुख मार्गावर मिठाई व सरबतचे वाटपही करण्यात आले. मार्केटयार्ड परिसरात प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

बेडकिहाळ येथे विविध उपक्रम

बेडकिहाळ :  मुस्लीम समाजात मोहम्मद पैगंबर हे थोर नबी म्हणून ओळखले जातात.  मोहम्मद पैगंबर यांची जयंती सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन विविध उपक्रमांनी साजरी करतात. ईद-ए-मिलाद हा सण हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रमोदकुमार पाटील यांनी केले.

 येथील बसस्थानक परिसरात यादे हुसेन ग्रुप व समस्त हिंदू-मुस्लीम समाजाच्यावतीने मोहम्मद पैगंबर यांची जयंती विविध साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पीकेपीएसचे अध्यक्ष जनगौडा धड्डपाटील, युवा नेते दत्तकुमार पाटील, संजय पाटील, ता. पं. सदस्य चाँद मुल्ला, माजी जि. पं. सदस्य अशोक आरगे, ग्रा. पं. सदस्य तात्यासाहेब केस्ते, डॉ. नाभिराज पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डिजीटल फलकाचे पूजन तात्यासाहेब केस्ते यांनी केले तर वृक्षारोपण जनगौडा धड्डपाटील, खिर वाटप दत्तकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्तकुमार पाटील, निहाल मुल्ला आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तकदीर जमादार, सिद्धेश्वर माने, नितीन वाडेकर, यासिन मुल्ला, वासिम मुल्ला, जावेद मुल्ला, फिरोज मुल्ला, अनिल सूर्यवंशी, मनोज जाधव, चंद्रकांत चौगुले, प्रशांत पाटील, संजय अलगुरे, बाळू जमादार, तौफिक मुल्ला यांच्यासह हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Related posts: