|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » Top News » कोहलीचे ‘विराट ‘ द्विशतक ; भारताचा पहिल्या डाव ५३६ धावांवर घोषित

कोहलीचे ‘विराट ‘ द्विशतक ; भारताचा पहिल्या डाव ५३६ धावांवर घोषित 

ऑनलाईन  टीम / नवी दिल्ली  :
 टीम इंडियाचा  कर्णधार  विराट कोहलीने पुन्हा एकदा आपली दमदार कामगिरी  दाखवली आहे . श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर कसोटीपाठोपाठ दिल्ली कसोटीतही त्याने  दणदणीत द्विशतक झळकावले आहे.  त्यासोबतच भारताने ५३६ धावांवर आपला डाव घोषित केला आहे. 
   कसोटी कारकीर्दीतील ही सहाही द्विशतकं विराटनं अवघ्या १८ महिन्यांत केली आहे. सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट आता सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसोबत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कर्णधार या नात्याने सर्वाधिक द्विशतक ठोकणारा विराट जगातला पहिला फलंदाज ठरला. त्याने ब्रायन लाराचा पाच द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला.

Related posts: