|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वसंत सावंत काव्य पुरस्कार सुशिलकुमार शिंदे यांना जाहीर

वसंत सावंत काव्य पुरस्कार सुशिलकुमार शिंदे यांना जाहीर 

‘आवानओल’च्या आठव्या उगवाई काव्य उत्सवात जानेवारीत वितरण

प्रतिनिधी / कणकवली:

कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2016-17 सालचा कविवर्य वसंत सावंत काव्यपुरस्कार ठाणे येथील कवी सुशिलकुमार शिंदे यांना त्यांच्या ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये आणि मानचिन्ह, शाल अशा स्वरुपाचा हा पुरस्कार जानेवारीत येथे होणाऱया आवानओलच्या आठव्या उगवाई काव्य उत्सवात कवी शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

आवानओल प्रतिष्ठानतर्फे गेली आठ वर्षे कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार दरवर्षी मराठीतील एका उत्कृष्ठ काव्यसंग्रहाला देण्यात येतो. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायंच म्हणतंय’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असून यापूर्वी प्रा. एकनाथ पाटील (इस्लामपूर), डॉ. शरयू आसोलकर (सावंतवाडी), अभय दाणी, श्रीधर नांदेडकर (औरंगाबाद), विनोद कुमरे (मुंबई), सुजाता महाजन (पुणे) आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

शिंदे गेली दहा वर्षे लक्षवेधी कवितालेखन करीत असून त्यांचा ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ हा संग्रह ऑगस्ट 2016 मध्ये प्रकाशित झाला. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे अल्पावधीत या संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. या संग्रहाला यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नामवंत समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची या संग्रहाला दीर्घ प्रस्तावना लाभली असून ज्येष्ठ कवी प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी या संग्रहाची मलपृष्ठावर पाठराखण केली आहे. महानगरीय जगण्याचा कोलाहल, वर्गीय ताणपेच आणि स्त्राrविषयीचा प्रागतिक स्वर आळविणारी मानव्याच्या अस्सल गुणसूत्रांची कविता शिंदे यांनी लिहिली आहे. ‘कुठल्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीरच असतो’ असे सांगणारा हा तरुण कवी ‘सूर्यबिज डोळय़ात साचवलेली माणसे’ कवितेतून समर्थपणे मांडतो. स्त्राrला संस्कृतीरचित दिली जाणारी विषम वागणूक आणि तिचा चिवट जगण्याचा धर्म याबद्दलचा उन्नत भाव या कवितेतून व्यक्त होत असल्याने कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कारासाठी या संग्रहाची निवड करण्यात आल्याचे आवानओल प्रतिष्ठानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts: