|Thursday, July 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जागतिक शरणार्थी करारातून अमेरिका बाहेर

जागतिक शरणार्थी करारातून अमेरिका बाहेर 

संयुक्त राष्ट्रः

अमेरिकेने आता संयुक्त राष्ट्र जागितक शरणार्थी कायद्यातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ओबामांच्या कार्यकाळात झालेल्या या करारातील अनेक तरतुदी अमेरिकेच्या स्थलांतर तसेच शरणार्थी धोरणातील तत्वांच्या विरोधात असल्याचे ट्रम्प प्रशासनाने सांगितले. ट्रम्प प्रशासनाने युनेस्को आणि पॅरिस हवामान बदल करारासमवेत अनेक जागतिक प्रतिबद्धतेतून अंग काढून घेतले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कराराच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी कटिबद्ध आहेत. संयुक्त राष्ट्र महासचिवांना अमेरिकेच्या या निर्णयाची माहिती देण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकन दूतावासाने सांगितले. शरणार्थी विषयक संयुक्त राष्ट्राच्या घोषणेत सामील होण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयानंतर 2016 मध्ये अमेरिका कराराच्या प्रक्रियेत सामील झाली होती. अमेरिकेला जगभरात शरणार्थींना मदत देण्याच्या स्वतःच्या वारशावर आणि दीर्घकाळापासून चालत आलेलया नैतिक नेतृत्वावर अभिमान आहे. याप्रकरणी अमेरिकेने कोणत्याही देशापेक्षा अधिक कार्य केले आहे. आमचा उदारमतवाद कायम राहणार असून स्थलांतर धोरणांवरील निर्णय अमेरिकेनेच घ्यावेत. सीमेवर नियंत्रण चांगले कशाप्रकारे होईल याचा निर्णय आम्हीच घेऊ. तसा देशात कोणाला प्रवेशाची अनुमती मिळावी हे देखील अमेरिकाच ठरवेल. न्यूयॉर्क घोषणेत जागतिक दृष्टीकोन अमेरिकेच्या सार्वभौमत्वाच्या अनुकूल नव्हता असा दावा अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निक्की हेली यांनी केला.

Related posts: