|Monday, October 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एफबीआयवर दुटप्पीपणाचा ट्रम्प यांनी केला आरोप

एफबीआयवर दुटप्पीपणाचा ट्रम्प यांनी केला आरोप 

वॉशिंग्टन

: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफबीआय आणि न्याय विभागावर टीका केली आहे. वैयक्तिक ईमेल सर्व्हरप्रकरणी चौकशी झालेल्या माजी विदेशमंत्री हिलरी क्लिंटन यांना जी वागणूक मिळाली, त्याच्या तुलनेत माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिन यांना कठोरपणे वागविले जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. एफबीआयशी अनेकदा खोटं बोलणाऱया हिलरींसोबत काहीच झाले नाही, तर जनरल फ्लिन यांनी एकदाच चुकीची माहिती दिली असता त्यांचे जीवनच उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. फ्लिन यांनी रशियन राजदूताशी असलेल्या संबंधांबद्दल खोटं बोलण्याचा आरोप शनिवारी न्यायालयात मान्य केला होता.  फ्लिन खोटं बोलले असता त्यांच्यावर कठोर कारवाई होते, तर एफबीआय चौकशीला सामोरे जाणाऱया कुटिल हिलरी क्लिंटन अनेकदा असत्य बोलतात आणि त्यांच्या विरोधात कारवाईच होत नाही, असे का? व्यवस्था भ्रष्ट आहे का एफबीआयचा दुटप्पीपणा असा प्रश्न ट्रम्प यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला.

 

 

Related posts: