|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुढील दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता

पुढील दोन दिवसात राज्यात पावसाची शक्यता 

पुणे / प्रतिनिधी

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओक्खी चक्रीवादळामुळे सध्या केरळ, तामिळनाडूत वादळी वाऱयांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्याच्या दिशेने अतिउष्ण व आर्दतायुक्त वारे वाहत असल्याने मंगळवारपासून हलका पाऊस राज्यातील बहुतांश भागात पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात रविवारी ढगाळ वातावरण होते. सोमवारी देखील असेच ढगाळ वातावरण राहणार असून, मंगळवारी आणि बुधवारी पावसाच्या हलक्या सरी पडतील. काही दिवसांपूर्वी पुण्यासह राज्याच्या काही भागांत 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडला होता. आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ऐन थंडीत पुन्हा राज्यभर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद विदर्भातील गोंदिया येथे 10 अंश सेल्सिअस झाली. पुणे 12.4, नगर 13.2, सातारा 16.4, कोल्हापूर 19.5, मुंबई 20, सोलापूर 15.5, औरंगाबाद 13.6, नाशिक 11.6, नागपूर 11.3 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली.

Related posts: