|Saturday, January 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून माझा अपमान

राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून माझा अपमान 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यालयाने माझा अपमान केला, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव  शहजाद पुनावाला यांनी रविवारी केला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक केवळ औपचारिकता आहे. या पदासाठी निवडणूक नसून एका व्यक्तीची नियुक्ती होणार आहे. काँग्रेस पक्ष एका कुटुंबाची मालकीचा आहे, अशी टीका त्यांनी यापूर्वी केली होती.

पुनावाला यांनी रविवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, रविवारी सकाळी मी राहुल गांधी यांच्या कार्यालयाशी फोनवरून संपर्क साधला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात काही शंका असून ही निवडणूक स्थगिती करावी, यासाठी मी विचारणा केली. राहुल गांधी यांच्याकडे काही नैतिकता असल्यास ते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करतील, अशी मला अपेक्षा होती, मात्र त्यांच्या कार्यालयाकडून माझा अपमान करण्यात आला.

 

 

 

Related posts: