|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » क्रेग बेथवेटच्या खेळीने विंडीजचे आव्हान जिवंत

क्रेग बेथवेटच्या खेळीने विंडीजचे आव्हान जिवंत 

वृत्तसंस्था / वेलिंग्टन

क्रेग ब्रेथवेटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या यजमान न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशीअखेर विंडीजचे आव्हान जिवंत राहिले आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या ब्लंडेलने  कसोटी पदार्पणात शतक झळकविले. न्यूझीलंडने पहिल्या डावात विंडीजवर 386 धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर विंडीजने दुसऱया डावात 2 बाद 214 धावा जमविल्या. विंडीजचा संघ अद्याप 172 धावांनी पिछाडीवर आहे.

या कसोटीत विंडीजचा पहिला डाव 134 धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंडने 9 बाद 447 या धावसंख्येवरून तिसऱया दिवसाच्या खेळाला प्रारंभ केल्यानंतर त्यांच्या शेवटच्या जोडीने आणखी 73 धावांची भर घातली. उपाहारापूर्वीच न्यूझीलंडने आपला पहिला डाव 148.4 षटकांत 9 बाद 520 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडच्या ब्लंडेल आणि बोल्ट या शेवटच्या जोडीने अभेद्य 78 धावांची भागिदारी केली. कसोटी पदार्पणात ब्लंडेलने 180 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 107 धावा झळकविल्या. बोल्टने 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे शनिवारी ग्रॅण्डहोमने शतक (105) झळकविले होते. टेलरचे शतक 7 धावांनी हुकले. विंडीजतर्फे रॉचने 3 तर कमिन्स आणि चेस यांनी प्रत्येकी दोन, गॅब्रियल आणि होल्डर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

2013 साली विंडीजने न्यूझीलंडच्या दौऱयातील पहिल्या कसोटीत अशीच चिवट खेळी केली होती. या कसोटीत न्यूझीलंडने विंडीजला फॉलोऑन दिला होता. त्यानंतर मॅरेलॉन सॅम्युअल्सने द्विशतक झळकविल्याने विंडीजने दुसऱया डावात 507 धावा खेळाच्या शेवटच्या दिवशी जमविल्या होत्या त्यामुळे न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 112 धावांचे आव्हान मिळाले होते पण पुरेसा कालावधी नसल्याने ही कसोटी अनिर्णित राहिली होती.

386 धावांची न्यूझीलंडने आघाडी घेतल्यानंतर विंडीजने दुसऱया डावाला दडपणाखाली प्रारंभ केला आणि दिवसअखेर त्यांनी 66 षटकांत 2 बाद 214 धावा जमविल्या. सलामीच्या क्रेग बेथवेटने किरेन पॉवेलसमवेत पहिल्या गडय़ासाठी 72 धावांची तर त्यानंतर हेटमेयरसमवेत दुसऱया गडय़ासाठी 94 धावांची भागिदारी केली. पॉवेलने 55 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 40 तर हेटमेयरने 89 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 66 धावा जमविल्या. क्रेग ब्रेथवेट 1 षटकार  आणि 7 चौकारांसह 79 तर एस. हॉप 4 चौकारांसह 21 धावांवर खेळत आहेत. हॉप आणि ब्ा्रsथवेट यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 48 धावांची भर घातली आहे. न्यूझीलंडतर्फे हेन्रीने 33 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

विंडीज प. डाव 134, न्यूझीलंड प.डाव 148.4 षटकांत 9 बाद 520 डाव घोषित (ब्लंडेल नाबाद 107, ग्रॅण्डहोम 105, टेलर 93, निकोल्स 67, रॅव्हेल 42, लेथम 37, रॉच 3/85, कमिन्स 2/92, चेस 2/95, होल्डर 1/102, गॅब्रियल 1/90), विंडीज दु. डाव- 66 षटकांत 2 बाद 214. (क्रेग ब्रेथवेट खेळत आहे 79, पॉवेल 40, हेटमेयर 66, एस हॉप खेळत आहे 21, हेन्री 2/33).