|Monday, July 16, 2018
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडची भारतावर निसटती मात

इंग्लंडची भारतावर निसटती मात 

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

येथे सुरू असलेल्या हॉकी विश्व लीग अंतिम स्पर्धेत ब गटातील झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 3-2 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. इंग्लंडतर्फे सॅम वॉर्डने 2 गोल नोंदविले.

या सामन्यात दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळ पाहावयास मिळाला. इंग्लंडच्या सॅम वॉर्डने 43 व्या आणि 57 व्या मिनिटाला असे दोन मैदानी गोल नोंदविले. तत्पूर्वी म्हणजे 25 व्या मिनिटाला डेव्हिड गुडफिल्डने इंग्लंडचे खाते उघडले होते. भारतातर्फे आकाशदीप सिंगने 47 व्या मिनिटाला तर रूपिंदरपाल सिंगने 50 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. आता या स्पर्धेत भारताचा पुढील सामना जर्मनीशी येत्या सोमवारी होत आहे. ब गटातील भारताचा हा शेवटचा सामना आहे. ब गटातील अन्य एका सामन्यात जर्मनीने ऑस्ट्रेलियाला 2-2 असे बरोबरीत रोखले. जर्मनीतर्फे मार्को मिलकेयुने सातव्या मिनिटाला तर कर्णधार मार्टिन हॅनेरने 58 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ऑस्ट्रेलियातर्फे ब्लेक गोव्हर्सने 39 व्या तर ऍरॉन क्लिनस्किमेडने 49 व्या मिनिटाला गोल केले. सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लढत होईल.

Related posts: