|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » मँचेस्टर युनायटेडची अर्सेनेलवर मात

मँचेस्टर युनायटेडची अर्सेनेलवर मात 

वृत्तसंस्था / लंडन

इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात दहा खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या मँचेस्टर युनायटेडने अर्सेनेलचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला.

या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर युनायटेड दुसऱया स्थानावर आहे. अर्सेनेल संघाला घराच्या मैदानावरील तब्बल बारा सामन्यांतील विजयानंतर हार पत्करावी लागली आहे. मँचेस्टर युनायटेडतर्फे जेसी लिनगार्डने दोन गोल तर लॅकेझेटीने एक गोल नोंदविला. कर्णधार व्हॅलेन्सिया आणि लिनगार्ड या जोडीने आक्रमक चढाया करत 11 मिनिटांच्या कालावधीत मँचेस्टर युनायटेडचे दोन गोल नोंदविले. या सामन्यात मँचेस्टर युनायटेडच्या पॉल पोग्बाला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने या संघाला शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. अर्सेनेलतर्फे लॅकेझेटीने एकमेव गोल उत्तरार्धात नोंदविला. मँचेस्टर सिटी पहिल्या स्थानावर असून ते मँचेस्टर युनायटेडपेक्षा पाच गुणांनी आघाडीवर आहेत.

Related posts: