|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महालक्ष्मी भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी राजू मेवेकरींची फेरनिवड

महालक्ष्मी भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी राजू मेवेकरींची फेरनिवड 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  ताराबाई रोड येथील महालक्ष्मी भक्त मंडळाच्या अध्यक्षपदी राजू मेवेकरी यांची तर उपाध्यक्षपदी नानासो नष्टे यांची फेरनिवड करण्यात आली. रविवार 3 रोजी निवडी संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये सर्वच पदाधिकाऱयांची फेरनिवड करण्यात आली.

  संस्थेचे संचालक अनिल जाधव-कसबेकर यांनी अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांची फेरनिवड करण्याचे सुचविले. त्यास संचालक एस. के. कुलकर्णी यांनी अुनमोदन दिले. यावर उपस्थित सर्व संचालकांनी संमती दिलेल्या सर्वच पदाधिकाऱयांची फेरनिवड करण्यात आली. खाजिनदारपदी वसंतराव पोवार, कार्यवाहपदी गजानन नार्वेकर आणि सहकार्यवाहपदी रणजित नार्वेकर यांचीही फेरनिवड झाली. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱयांना शरद गोसावी, संजय जोशी, कीरण धर्माधिकारी, राजन झुरळे, अमित मेवेकरी, संजय बावडेकर, हर्षदा मेवेकरी,  प्रमोद भिडे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अध्यक्ष मेवेकरी यांनी अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने जबाबदारी वाढली आहे. संस्थेचे कार्य आणखी उल्लेखनीय करुन संस्थेच्या नावलौकिकामध्ये भर पाडण्याच्या दृष्टीने नव्या संकल्पना व उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करत सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. 

Related posts: