|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इनाम महाळुंगेत शेतकऱयाची कर्जाला कंटाळून आत्महत्त्या

इनाम महाळुंगेत शेतकऱयाची कर्जाला कंटाळून आत्महत्त्या 

प्रतिनिधी/ चंदगड

इनाम महाळुंगे येथील शेतकरी कृष्णा सिताराम गावडे (वय.40) याने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

कृष्णा सिताराम गावडे गेल्या पाच-सहा वर्षापासून कर्जबाजारी होते. शेतातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत होता. शासनाचाही कर्जमाफीचा लाभ त्याला मिळाला नाही. या नैराशातून तो गेले काही दिवस तणावाखाली वावरत होता. शनिवारी घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने घराच्या कैचीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. थोडय़ावेळानंतर घरातील लोकांना कृष्णा गावडेचा मृतदेह कैचीला लटकत असल्याचा दिसताच आरडाओरडा सुरू झाला. गावातील सर्व लोकांनी जमून घटनेची माहिती चंदगड पोलीसांना कळवली. घटनास्थळी चंदगडचे पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चंदगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. तेथील डॉक्टरांनी कृष्णा गावडे याचा दोरीने गळाआवळय़ाने मयत झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कृष्णा गावडे याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Related posts: