|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूरकर अनुभवणार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा थरार

सोलापूरकर अनुभवणार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा थरार 

जामश्री आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे थाटात उद्घाटन

प्रतिनिधी/ सोलापूर

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने जामश्री पुरस्कृत महिला ओपन आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे आज रविवारी थाटात उद्घाटन झाले. जामश्रीमुळे सोलापुरकरांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे थरार अनुभवास मिळणार आहे.

सोलापुरातील कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल येथील लॉन टेनिसच्या कोर्टवर आज (रविवार) सायंकाळी थाटात झाले. सोलापूर मल्लखांब असोसिएशनच्या वतीने क्रेनला दोरी अडकवून मल्लखांबचे चित्तथरारक खेळ दाखविले. त्याचबरोबर रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले पर्स उपस्थित खेळाडू स्पर्धकांना भेट म्हणून दिली. त्या मोबदल्यात स्पर्धकांनीही त्यांना भेटवस्तू देत विद्यार्थ्यांच्या चेहऱया हसू खुलविले.

स्पर्धेची बक्षिस रक्कम 1500 डॉलर्स असून खेळाडुंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहे. अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापुरात तिसऱयांदा भरवण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी एकुण भारतासह 18 देशातून 56 महिला सहभागी होणार असून यामधील 25 विदेशी महिला खेळाडांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने नितिन कन्नमवार यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेने राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने सुप्रिया चॅटर्जी, परिक्षित शर्मा, सैकत रॉय, रोहित बालगवी, थमचोटे यांची नियुक्ती केलेली आहे.

या स्पर्धेमुळे नक्कीच सोलापुराकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा अनुभवास मिळणार आहे. जामश्री, बालाजी अमाईन्स, प्रिसिजन, युनिटीच्या वतीने सर्व स्पर्धाकांची उत्तम सोय करण्यात आली असून या स्पर्धा शनिवार 9 डिसेंबर पर्यंत चालणार आहेत.

परदेशी पाहुण्यांना फेटय़ांचे आकर्षण

या स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना तसेच मान्यवरांना फेटा बांधण्यात आला. परंतु परदेशी पाहुण्यांना फेटय़ांचे एक वेगळेच आकर्षण जाणवले. ते फेटा बांधून घेवून सेफ्ली आणि फोटोज् काढत होते.

प्रत्येक वर्षी टेनिस स्पर्धा भरविण्याचा निर्धार

सोलापुरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा अनुभवता याव्यात तसेच सोलापुरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धकांशी ओळख व्हावी. तसेच त्यांच्याकडूनही काही शिकता यावे या हेतून गेल्या दोन वर्षांपासून जागतीक स्पर्धा भरवत आहोत. भविष्यात अनेक वर्षी आम्ही अशा स्पर्धा भरवू. जेणेकरून सोलापुरातील प्रत्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनावा.

Related posts: