|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ओबीसींच्या मागण्या शासन दरबारी मांडणार

ओबीसींच्या मागण्या शासन दरबारी मांडणार 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन : देशातील पहिल्या ओबीसी जनगणना संमेलनाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ सोलापूर

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसी आरक्षणाचा समावेश सुची 3 मध्ये करावा, ओबीसी वर्गाला विधानसभा, लोकसभेमध्ये आरक्षण द्यावे अशा विविध प्रकारच्या 18 मागण्या संदर्भात शासन दरबारी मांडणार असल्याचे प्रतिपादन, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.

   राष्ट्रीय पिछडा वर्ग, अनु. जाती, अनु. जनजमाती, अल्पसंख्यांक महासंघ, नवी दिल्ली व महाराष्ट्र ओबीसी संघर्ष समिती विद्यमाने व मंडल आयोग रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी कन्ना चौक येथील मडिवाळेश्वर मंगल कार्यालयात देशातील पहिले ओबीसी जनगणना संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर व संमेलनाचे अध्यक्ष सुभाष पाटणकर, नाशिक साहित्यिक व विचारवंत श्रावण देवरे, पीआरपी नेते राजाभाउढ इंगळे, दशरथ गोप, नगरसेवक संजय कोळी, डॉ. अजिज नदाफ, गणेश पाटील, युवराज चुंबळकर, सुशांत कारळे उपस्थित होते.

 प्रारंभी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याहस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत देशातील पहिले ओबीसी जनगणना संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. पाटणकर म्हणाले, ओबीसी समाज विखुरलेला आहे. आपला विकास करायचा असेल एकत्रित येण्याशिवाय पर्याय नाही. जनगणना होईपर्यंत लढा देणे गरजेचे आहे. ओबीसींच्या ज्या काही अडचणी यासाठी सोलापुरात ओबीसी कार्यालय होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा त्यांनी संमेलनात केली.

  राजा इंगळे म्हणाले, आज ओबीसीची अवस्था बिकट आहे. ओबीसींची जनगणना संमेलन होणे गरजेचे असून सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. तसेच आजच्या काळात सर्वांनी शाहु-फुले-आंबेडकर विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहेत. प्रास्ताविक राजन दिक्षीत यांनी केले तर  सूत्रसंचालन दिपक होमकर यांनी केले. आभार संतोष भाकरेंनी मानले.  

ओबीसीची जनगणना झाल्यास अनेक पिढय़ांचे भले

ओबीसी समाज विखुरलेला आहे. त्यामुळे आजपर्यंत ओबीसी समाजाचा विकास झालेला नाही. ओबीसी समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे. मंडल आयोगात नमूद करूनही ओबीसीची जनगणना अद्याप झालेली नाही. जर ओबीसी जनगणना झाल्यास अनेक पिढय़ांचे भल होईल. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्रित येत आता घराबाहेर पडून लढा दिला पाहिजे. तर हे शक्य होईल. जनगणना न झाल्यास ओबीसीची पुढची पिढी बरबाद होईल, असेही देवरे म्हणाले. जर जणना न झाल्यास ओबीसी समाजाच्या मुलांना नोकरीपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे ओबीसी जनगणना व्हावी यासाठी जागृत होण्याची गरज आहे.

Related posts: