|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तिसवाडीत गोवा फॉरवर्ड ताकद म्हणून पुढे येईल

तिसवाडीत गोवा फॉरवर्ड ताकद म्हणून पुढे येईल 

प्रतिनिधी/ पणजी

पुढील विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्ष तिसवाडी तालुक्यात एक ताकद म्हणून पुढे येईल व आपले अस्तीत्व तिसवाडीत दाखवून देईल, असे गोवा फॉरवर्डचे नेते व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. सांताप्रुझ मतदारसंघात काल बाबुश मोन्सेरात यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर, बाबुश मोन्सेरात, ट्रॉजन डिमेलो व इतर पदाधिकाऱयांची उपस्थिती होती. गोवा फॉरवर्ड आज सरकारमध्ये सहभागी आहे. सर्व समाजाचा व सर्व वयोगटातील लोकांचा आवाज म्हणून गोवा फॉरवर्ड पुढे येत आहे. सर्व वयोगटातील लोक आज गोवा फॉरवर्डकडे आकर्षित होत आहेत. गोव्याचे सुवर्णमयी भवितव्य गोवा फॉरवर्डला पहायची इच्छा आहे. त्यामुळे आज सर्वांना बरोबर घेऊन जात आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. सर्व गोमंतकीयांनी बंधुत्वाच्या नात्याने वागावे यासाठी गोवा फॉरवर्ड प्रयत्नशील आहे. बाबुश मोन्सेरात यांच्या माध्यमातून गोवा फॉरवर्ड तिसवाडी तालुक्याला न्याय देईल. मागील विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डने चार उमेदवार उभे केले व त्यापैकी तीन निवडून आणले. येत्या विधानसभा निवडणुकीत तिसवाडीत गोवा फॉरवर्ड ताकद म्हणून पुढे येईल, असेही ते म्हणाले. सांताप्रुझ येथील नवीन कार्यालयात गोवा फॉरवर्डचे मंत्री येतील व समस्या जाणून घेतील असेही ते म्हणाले.

चिंबल पंचायत गोवा फॉरवर्डमध्ये

काल चिंबल पंचायतीचे सरपंच चंद्रकांत कुंकळकर, उपसरपंच मनिषा चोपडेकर व अन्य पंचसदस्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. तसेच जिल्हा पंचायत सदस्य व अन्य कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला. यानंतर मेरशी व सांताप्रुझ पंचायत सदस्य गोवा फॉरवर्डमध्ये आणणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सांताप्रुझच्या लोकांना सोडलेले नाही : मोन्सेरात

आपण सांताप्रुझ मतदारसंघातील लोकांना सोडलेले नाही. त्यामुळेच आज सांताप्रुझमध्ये कार्यालय स्थापन केले, असे बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले. आपण  सांताप्रुझ मतदारसंघाचा आमदार असताना खुप मोठी कामे झाली नाहीत, मात्र मागील आमदारापेक्षा आपण निश्चितच जास्त कामे केली. आपण त्यावेळी काँग्रेसचा आमदार असल्याने व विरोधात असल्याने या मतदारसंघाचा विकास रोखला होता, असेही ते म्हणाले. चिंबलमध्ये रस्ते चांगले नाहीत, कचऱयाची समस्या आहे. या समस्या सोडवायला हव्यात, असेही ते म्हणाले.

Related posts: