|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जाणता राजा नाटय़प्रयोगाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ

जाणता राजा नाटय़प्रयोगाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ 

प्रतिनिधी / बेळगाव

येथील सी. पी. एड. मैदानावर दि. 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत होणाऱया जाणता राजा नाटय़प्रयोगाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. उद्योजक दिलीप चिटणीस यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्किटेक्ट विनय बेहरे, उद्योजक पंकज प्रधान, क्रीडाप्रेमी सदानंद चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

तब्बल 12 वर्षांनंतर होणाऱया जाणता राजा महानाटय़ाचे प्रयोग म्हणजे शिवप्रेमी बेळगावकरांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे हा प्रयोग पाहण्याची संधी गमावू नये, तसेच उद्योजकांनी आपल्या कामगारवर्गाला हा प्रयोग पाहण्यासाठी प्रोत्सहित करावे, असेही आवाहन त्यांनी केले.

 तिकीट विक्री शुभारंभाच्या निमित्ताने दिलीप चिटणीस यांनी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश तरुण भारत ट्रस्टचे सचिव जगदीश कुंटे यांच्याकडे सुपूर्द केला. आर्किटेक्ट विनय बेहरे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करून प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. जगदीश कुंटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिलीप चिटणीस यांच्या हस्ते गणेशपूजन आणि विनय बेहरे यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन झाले.

यावेळी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, लोकमान्यचे संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे, अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, परशुराम माळी, डॉ. अरुण शिर्के, लोकमान्यचे समन्वयक विनायक जाधव आदी उपस्थित होते. 

Related posts: