|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ज्योतीनगर येथे बेकायदा दारू जप्त

ज्योतीनगर येथे बेकायदा दारू जप्त 

प्रतिनिधी / बेळगाव

ज्योतीनगर, कंग्राळी के. एच. परिसरात बेकायदा दारू विकणाऱया एका तरुणाला अटक करून त्याच्या जवळून सुमारे 1100 रुपये किमतीच्या बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

2 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ज्योतीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. बसवराज दानाप्पा दाणण्णावर (वय 25, मूळचा रा. बैलवाड, सध्या रा. ज्योतीनगर) याला अटक करून त्याच्या जवळून 1100 रुपये किमतीच्या बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कोंकण्यागोळ व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून बसवराजला ताब्यात घेतले. 2 डिसेंबर रोजी शहरात मद्यविक्री बंदीचा आदेश असताना त्याने परवानगी नसताना विक्री सुरू केली होती. 

 

Related posts: