|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कॅन्टोन्मेंट परिसरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच

कॅन्टोन्मेंट परिसरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच 

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट परिसरात कचऱयाला आग लावणाऱयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आला होता. मात्र, हा इशारा धाब्यावर बसवून लष्करी छावणी परिसरातील बंगल्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे कॅन्टोन्मेंट यावर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरातील कचऱयाची उचल करण्याऐवजी कचराकुंडीतच जाळण्यात येतो. ठिकठिकाणी असे प्रकार निदर्शनास येत असून, याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. मात्र अलीकडेच याबाबत कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा करण्यात आली. कॅन्टोन्मेंट परिसरात कचरा जाळण्याचे प्रकार नियमितपणे होत असल्याने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कचरा जाळण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील देण्यात आला. पण हा आदेश धाब्यावर बसवून लष्करी छावणी परिसरातील बंगल्यांमध्ये कचरा जाळण्याचा प्रकार नियमितपणे सुरू आहे.

Related posts: