|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लग्नाच्या वरातीवर समाजकंटकांची दगडफेक

लग्नाच्या वरातीवर समाजकंटकांची दगडफेक 

प्रतिनिधी/ बेळगाव

लग्नाच्या वरातीवेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे वातावरण तंग झाल्याचा प्रकार अळवण गल्ली, शहापूर येथे रविवारी रात्री 9-30 च्या दरम्यान घडला. दगडफेकीनंतर पळापळ झाल्यामुळे त्या भागातील व्यवहार बंद झाले. तसेच पोलीस बंदोबस्तात त्वरित वाढ करण्यात आली. दगडफेकीत चार रिक्षांच्या काचा फोडल्याने रिक्षांचे नुकसान झाले आहे. दरम्यान रात्री 10-30 च्या सुमारास कामत गल्ली येथेही क्षुल्लक कारणावरून दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेत तीन रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यानंतर येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत लग्न समारंभ आटोपून अळवण गल्लीमार्गे निघालेल्या वरातीवर काही समाजकंटकांकडून दगडफेकीचा प्रकार घडला. हा प्रकार घडण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र वरातीमध्ये असणाऱया काही जणांनी आगळीक करण्याचा प्रकार केल्याने वाद उद्भवल्याचे पोलिसांनी सांगितले.  दगडफेकीत एक युवक जखमी झाल्याचे समजते. घटनेनंतर या मार्गावरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. काहींनी दगडफेक सुरू केल्यानंतर या मार्गावरील रिक्षांवरही दगडफेक झाली. त्यामध्ये चार रिक्षांचे नुकसान झाले आहे.

कामत गल्ली येथेही घबराट

शहापूरमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर कामत गल्ली येथेही रविवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान क्षुल्लक कारणावरून दगडफेकीचा प्रकार घडला. यात तीन रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे तेथेही वातावरण तंग बनले होते. त्या भागातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Related posts: