|Thursday, October 18, 2018
You are here: Home » leadingnews » काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्षपदासठी आतापर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल,अशी शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमध्ये ‘राहुल राज’ला सुरूवात होणार आहे.

सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. आताही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे देशभारातील 900 नेते काँग्रेस मुख्यालयात उपस्थित राहतील. राहुल गांधींच्या उमेदवारीचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाटी एवढय़ा मोठय़ा संख्येने नेते दिल्लीतील अकबर रोड इथल्या मुख्यालयात दाखल झाले आहेत.

 

Related posts: