|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » नागपूरजवळ ऍम्बूलन्स आणि ट्रकच्या भीषण अपघात ; चार ठार तर पाच जखमी

नागपूरजवळ ऍम्बूलन्स आणि ट्रकच्या भीषण अपघात ; चार ठार तर पाच जखमी 

ऑनलाईन टीम / नागपूर :

अकोल्याहून नागपूरच्या मेयो रूग्णालयात येत असलेल्या एका ऍम्बूलन्स आणि ट्रकच्या भीषण अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अकोल्यातील १२ वर्षांच्या मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने नागपूरमधील मेयो रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजारी मुलगा, त्याचे आई-वडिल आणि अन्य दोन जण एका रुग्णवाहिकेतून नागपूरला जाण्यासाठी निघाले. सोमवारी पहाटे चार वाजता रुग्णवाहिका नागपूर- अमरावती मार्गावर असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात मुलगा, त्याची आई आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. तर मुलाचे वडील या अपघातात जखमी झाले आहेत. नागपूरमधील मेयो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ज्या रुग्णालयात मुलाला उपचारासाठी नेले जात होते, त्याच रुग्णालयात आता त्या मुलाचे शवविच्छेदन होणार असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. धुक्यामुळे ट्रकचालकाला अंदाज आला नाही आणि हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related posts: