|Friday, July 20, 2018
You are here: Home » Top News » डीएसकेंना हायकोर्टाकडून 15 दिवसांची डेडलाईन

डीएसकेंना हायकोर्टाकडून 15 दिवसांची डेडलाईन 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना हायकोर्टाने 15 दिवसांत पैसे भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे 19 डिसेंबरपर्यंत डीएसकेंची अटक टळली आहे.

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालायने डी एस कुलकर्णी यांना फटकारत, केवळ एक तासाची मुदत दिली होत. बँकांकडे तारण ठेवलेल्या संपत्तीची यादी दाखवू नका, तात्काळ विकता येतील अशा संपत्तीची यादी तासाभरात सादर करा, असे आदेश हायकोर्टाने डीएसकेंना दिला होता. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत हायकार्टाने डीएसकेंना 15 दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, 15 दिवसांत 50 कोटी भरण्याची तयारी असल्याचे डीएसकेंनी कोर्टात सांगितले आहे. तसेच ही रक्क्म जमा न केल्यास आत्मसमर्पण करण्यास तयार आहे,असे देखील डीएसकेंनी यावेळी सांगितले. त्यामुळे 19 डिसेंबरपर्यंत डीएकसेंची अटक टळली आहे.

 

Related posts: