|Thursday, December 14, 2017
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » जिओची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर

जिओची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिलायन्स जिओने प्रीपेड ग्राहकांसाठी पुन्हा एकदा धमाकेदार ऑफर लाँच केली आहे.जिओच्या डेटा क्रांतीनंतर टेलिकॉम सेक्टरमधील इतर कंपन्यांनी देखील नवनव्या ऑफर आणल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा जिओने हाय स्पीड इंटरनेटचे नवे प्लॅन लाँच केल्या आहेत.

जिओ वेबसाईटवरील माहितीनुसार, 509 रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फी अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल,मेसेच आणि फ्री रोमिंग मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 98 जीबी डेटा मिळणार आहे.दोन जीबीपर्यंत हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस होईल, या प्लॅनची व्हॅलिडिटी 49 दिवसांसाठी असणार आहे. यानंतर जिओने 799 रूपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगही असणार आहे.या प्लॅनमध्ये 84जीबीपर्यंत डेटा मिळणार असून याची व्हॅलिडिटी 28 दिवसासांठी असणार आहे.

 

Related posts: