|Friday, October 19, 2018
You are here: Home » leadingnews » शशी कपूर काळाच्या पडद्याआड

शशी कपूर काळाच्या पडद्याआड 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

शशी कपूर यांनी ‘चोर मचाये शोर’, ‘जब जब फुल खिले’, ‘दीवार’, ‘शान’, नमकहलाल, सिलसिला, सुहाग, शर्मिली, काला पत्थर, कभी कभी, सत्यम शिवम् सुंदर यासह अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. मोहक हास्य व देखणेपण यामुळे ते बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानले जात. ‘दीवार’ चित्रपटात अमिताभसोबतची त्यांची जुगलबंदी चांगलीच गाजली. ‘मेरे पास गाडी है, बंगला है, नोकच चाकर है…बँक बॅलन्स है…तुम्हारे पास क्या है…असा सवाल करणाऱया अमिताभला ‘मेरे पास माँ है…’ असे भावूक व बाणेदार उत्तर देणाऱया शशी कपूर यांच्या रुपातील प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर सर्वांच्या कायमच स्मरणात राहिला. त्यांच्या निधनाने एका स्मार्ट व प्रतिभावान अभिनेत्याला आपण हरपलो असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related posts: