|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय कंपन्यांकडून जर्मनीत 27 हजार रोजगार

भारतीय कंपन्यांकडून जर्मनीत 27 हजार रोजगार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

80 भारतीय कंपन्यांनी जर्मनीमध्ये 27,400 रोजगारनिर्मिती केली आहे. या कंपन्यांनी 2016 मध्ये 11.4 अब्ज युरोचे उत्पन्न कमविले. 2010 पासून भारतीय कंपन्यांची जर्मनीतील गुंतवणूक वाढत आहे. भारतीय कंपन्यांनी थेट विदेशी गुंतवणूक आणि विलीनीकरण, अधिग्रहणाच्या माध्यमातून विस्तार करत आहेत असे सीआयआय या संघटनेने म्हटले. 2010 ते 2016 दरम्यान भारतीय कंपन्यांकडून युरोपातील गुंतवणुकीत जर्मनी दुसऱया स्थानी असून 96 प्रकल्प कार्यरत आहेत.

भारतीय कंपन्यांनी ऑटोमोबाईल, धातू आणि धातू प्रक्रिया, व्यावसायिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक सेवा, फार्माक्युटिकल्स,  रसायने, इलेक्ट्रॉनिक्स आणि मशिन उभारणी यासारख्या प्रकल्पात सर्वाधिक गुंतवणूक केली. एकूण रोजगारापैकी टाटा स्टील, हिंडाल्को इन्डस्ट्रीज, सोना आटॉकॉम्प यांचा धातू (40 टक्के), ऑटोमोटिव्ह (29 टक्के), आयटी (9 टक्के) क्षेत्रात हिस्सा आहे. भारतीय कंपन्यांनी एक – पंचमांश अधिग्रहण ऑटोमोटिव्ह पुरवठा आणि एक – तृतीयांश अधिग्रहण मेकॅनिकल इंजिनियरिंग क्षेत्रात केले.

तंत्रज्ञान आणि नावीनतेचा पर्याय या कारणांनी भारतीय कंपन्या जर्मनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. युरोपियन महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्याने त्याचा लाभ जर्मनीला होईल. गुंतवणूक वाढेल आणि भारतीय कंपन्या जर्मनीकडे अधिक प्रमाणात आकर्षित होतील, असे सीईओंचे मत आहे.

Related posts: