|Saturday, January 19, 2019
You are here: Home » उद्योग » ‘ओला’कडून प्रमुख शहरांत लवकरच सायकल सुविधा

‘ओला’कडून प्रमुख शहरांत लवकरच सायकल सुविधा 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

ऍप आधारित कॅब सेवा पुरविणारी ओला कंपनी काही स्टार्टअप कंपन्यांची मदत घेत सायकल सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. आयआयटी कानपूर कॅम्पसमध्ये ओला पेडल नावाने सायकल भाडय़ाने देण्याच्या सेवेची चाचणी सुरू आहे. या परिसरात कंपनीकडून 500 ते 600 सायकल ठेवण्यात आल्या आहेत. येथील विद्यार्थी ओलाच्या ऍपवरून ज्या प्रकारे टॅक्सी बुक करता येते, त्याप्रमाणे सायकल सेवेचा लाभ घेतात.

कंपनीकडून प्रायोगिक पातळीवर चाचणी घेण्यात येत आहे. लवकरच अत्याधुनिक मॉडेल दाखल करण्यात येईल. तरुणांमध्ये लोकप्रिय असे मॉडेल सादर करण्याचा प्रयत्न असेल. कंपनीकडून क्यूआर कोड व जीपीएस टॅकिंगची व्यवस्था देण्यात येईल. विद्यापीठ परिसर व शहरांमध्ये ओला पेडल सेवा सुरू करण्याचा ओलाचा प्रयत्न राहणार आहे. बेंगळुरमध्ये युलू ही स्टार्टअप कंपनी चालू महिन्यात जीपीएस, ब्लुटुथच्या आधारे सायकल सेवा सुरू करणार आहे.

Related posts: