|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » ‘मारुती’कडून 40 हजारपर्यंत सूट

‘मारुती’कडून 40 हजारपर्यंत सूट 

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मारुती सुझुकी इंडियाने आपल्या वेगवेगळय़ा मॉडेलवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. कंपनीकडून मॉडेलनुसार 30 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देण्यात येत आहे. अल्टो 800 पासून एर्टिगापर्यंतच्या मॉडेलवर ही सवलत आहे. मात्र या यादीमध्ये ब्रेझा, डिजायर आणि बलेनो यासारख्या लोकप्रिय मॉडेलवर कोणतेही डिस्काऊंट देण्यात येत नाही.

अर्टिगाच्या डिझेल मॉडेलवर 40 हजारपर्यंत डिस्काऊंट देण्यात येत आहे. वॅगनआर वर 35 हजार रुपये आणि स्विफ्टवर 30 हजारपर्यंत डिस्काऊंट जाहीर करण्यात आले. कंपनीच्या अल्टो 800 वर 35 हजारांची सूट देण्यात येत आहे. ऑडी ही जर्मन कंपनी निवडक मॉडेलवर 8.85 लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे. ऑडी ए3, ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी क्यू3 या मॉडेलवर 3 लाखापासून 8.85 लाखापर्यंत सूट देत आहे. कंपनीकडून स्वस्त ईआयएमचा पर्याय देण्यात आला.