|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसचे घोषणापत्र

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसचे घोषणापत्र 

पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त करण्याचे आश्वासन

सुरत

काँग्रेसने गुजरातसाठी घोषणापत्र जाहीर केले आहे. 100 पानी या घोषणापत्रात गुजरातच्या जनतेला अनेक मोठी आश्वासने देण्यात आली. यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 10 रुपयांनी स्वस्त करण्यापासून शेतकऱयांना कर्जमाफी देण्यासारखी अनेक आश्वासने समाविष्ट आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरावरील मूल्यवर्धित कर 10 रुपयांनी कमी केला जाईल. तसेच राज्यात स्वतःचे सरकार आल्यास विजेचे बिल निम्म्यावर आणण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले.

?विद्यार्थी, तरुणांसाठी…

राज्यात सत्तेवर आल्यास उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि लॅपटॉपचे वितरण केले जाईल. 32 हजार कोटी रुपयांच्या योजनेद्वारे 25 लाख तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करू असे काँग्रेसने घोषणापत्रात नमूद पेले.

?गरिबांना स्वस्त औषधे

काँग्रेसने सरदार पटेल युनिव्हर्स हेल्थकेअर कार्डची घोषणा केली. यानुसार गरिबांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

?शेतकऱयांचे कर्ज माफ

सरकार स्थापन झाल्यावर किमान हमीभावाची घोषणा पेरणीच्या अगोदरच करू. शेतकऱयांचे कर्ज माफ केले जाईल. शेतकऱयांना प्राधान्यक्रमाच्या आधारावर वीज देण्यात येईल असे आश्वासन काँग्रेसने दिले.

?जीएसटीतून लघू उद्योगांना वगळू

लघू आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल. गरीब वर्गातील मुलांना शिक्षण उपलब्ध करण्यासाठी शाळांना मदत दिली जाणार आहे. राज्यात क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटूंचा सन्मान करू असे काँग्रेसने घोषणापत्रात नमूद केले.

?पाटीदारांना अनेक आश्वासने

पाटीदार आणि बिगर आरक्षित लोकांसाठी शिक्षण तसेच रोजगाराचा समान अधिकार दिला जाईल असे वक्तव्य गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंग सोलंकी यांनी केले. पाटीदारांना कलम 46 अंतर्गत आरक्षण देण्याचे विधेयक मांडण्यात येईल. आरक्षणप्राप्त नसलेल्या समुदायांसाठी विशेष आयोग स्थापन केला जाईल. त्याचबरोबर आर्थिकदृष्टय़ा मागासांना एका विशेष आयोगाद्वारे मदत दिली जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले.

Related posts: