|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओबीसी समुदायावर अल्पेश ठाकोरचा प्रभाव

ओबीसी समुदायावर अल्पेश ठाकोरचा प्रभाव 

सुरत

गुजरातमध्ये 3 तरुण नेत्यांनी भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेता जिग्नेश मेवानी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांची गुजरातमध्ये मोठी चर्चा आहे. जातीय समीकरणे पाहता तिन्ही नेते यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अल्पेश ठाकोरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तो काँग्रेस नेता खोडाभाई पटेल यांचाच पुत्र आहे. अल्पेशचा ओबीसी समुदायावर चांगला प्रभाव आहे. सामाजिक कार्यकर्ता ते राजकीय नेत्यापर्यंतचा प्रवास त्याने अत्यंत कमी कालावधीत पूर्ण केला.

दारूबंदीवरून उघडला मोर्चा

जवळपास 3 वर्षांच्या अगोदर अल्पेशने ठाकोर सेनेची स्थापना केली. परंतु तो मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये अवैध दारूच्या विक्रीविरोधात मोर्चा उघडल्याने चर्चेत आला. त्याच्या कार्यकर्त्यांनी देशी दारूच्या अड्डय़ांवर छापे टाकण्यास प्रारंभ केला. अवैध दारूमुळे ठाकोर समुदायाचे युवकच सर्वाधिक प्रभावित होत असल्याचा त्याचा युक्तिवाद होता. या मोहिमेमुळे 70 टक्क्यांपेक्षा अधिक ठाकोर समुदाय त्याच्याशी जोडला गेला. दारूबंदीच्या माध्यमातून तो प्रभावी नेता म्हणून उदयास आला.

काँग्रेसला होणार लाभ

दोन दशकांपासून सत्तेबाहेर राहिलेल्या काँग्रेसला अल्पेशकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. परंतु तो काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यास यशस्वी ठरणार की नाही येणारा काळच ठरवेल. गुजरातमध्ये जवळपास 50 टक्के मतदार ओबीसी आहेत. यात 20-22 टक्के मतदार तर ठाकोरच आहेत. काँग्रेसला कमीत कमी 125 मतदारसंघांमध्ये विजय मिळवून देईन असा दावा अल्पेशने केला.

Related posts: