|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शांततेत जगायचे असेल तर भाजपला विजयी करा

शांततेत जगायचे असेल तर भाजपला विजयी करा 

माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे आवाहन :

सुरत

राज्याच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सुरत पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महिलांना संबोधित केले. निवडणुकीत गुजरातच्या जनतेला आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी मंदिरांना भेटी देत आहेत. पूर्ण जीवनात मंदिरात गेले नाहीत, पण मतांसाठी मंदिरांना फेऱया मारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना राहुल गांधी यांच्याशी होऊच शकत नाही. पंतप्रधान मोदींच्या करिष्म्यामुळेच राहुल यांना मंदिरांमध्ये जावे लागत आहे.काँग्रेसला गुजरातमधील 108 आणि 181 ची हेल्पलाईन सेवा दिसत नाही. गुजरातमध्ये महिला अधिक सुरक्षित आहेत. शांततेत जगायचे असेल तर भाजपला विजयी करा. काँग्रेसचे चरित्र पहा आणि त्यांच्यासोबत आम्ही चालू शकतो का याचा विचार करा असे आवाहन त्यांनी केले.

Related posts: