|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओखी चक्रीवादळामुळे तेरेखोल नदीच्या पातळीत वाढ

ओखी चक्रीवादळामुळे तेरेखोल नदीच्या पातळीत वाढ 

वार्ताहर / आरोंदा:

केरळ व तामिळनाडूच्या किनाऱयावर आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम तेरेखोल नदीलगतच्या आरोंदा किरणपाणी खाडीवरही दिसून आला. रात्री 11 वाजता तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढली. परंतु बाजुला असलेल्या कांदळवनामुळे आरोंदा व परिसरातील गावात पाणी शिरले नाही, असे प्रतिपादन आरोंदा मच्छीमार संघाचे अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी केले.

निसर्गाने निर्माण केलेले तेरेखोल खाडीमुख हे आरोंदा तेरेखोल गावाच्या रक्षणासाठी बनवलेले आहे. भविष्यात समुद्रात कोणत्याही प्रकारची वादळे, भूकंप झाल्यास तेरेखोल-आरोंदा खाडी किनारे उद्धवस्त होणार नाही, याची दखल निसर्गानेच घेतली आहे. निसर्गानेच निर्माण केलेल्या तेरेखोल खाडीमुखाचे रुंदीकरण किंवा खोदकाम करू नये. तसे झाल्यास आरोंदा गावात समुद्राचे पाणी घुसून जलमय होण्यास वेळ लागणार नाही, असेही मोटे यांनी सांगितले.

तेरेखोल खाडीत बेकायदेशीर वाळू उपसामुळे खाडीची खोली वाढली, खारफुटी नष्ट झाली. त्यामुळे उधाणाचे पाणी किनारपट्टीवर घुसू लागले आहे. याची महाराष्ट्र व गोवा शासनाने दाखल घेऊन खाडी उद्धवस्त होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन श्री. मोटे यांनी केले अगाहे.

Related posts: