|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गर्दी जमविण्यासाठी अण्णाद्रमुक आमदाराने लोकांना वाटली दारू

गर्दी जमविण्यासाठी अण्णाद्रमुक आमदाराने लोकांना वाटली दारू 

चित्रफित आली समोर : आमदाराने आरोप फेटाळला

चेन्नई / वृत्तसंस्था

तामिळनाडूतील सत्तारुढ पक्ष अण्णाद्रमुकच्या एका आमदाराची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या चित्रफितीत पक्षाच्या एका कार्यक्रमात लोकांना जमविण्यासाठी आमदार रक्कम तसेच दारूचे वाटप करताना दिसून येतो. चित्रफित प्रसारित झाल्यावर आमदार आर. कनागराज यांच्यावर लाचखोरीचे आरोप होत आहेत. तर आमदाराने हे आरोप फेटाळले.

चित्रफितीत एमजीआर शताब्दी वर्ष समारंभानिमित्त पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी कनागराज पैसे वाटत असताना दिसून येतात. यादरम्यान त्यांनी लोकांना दारू देखील पुरविली. चित्रफितीत आमदाराच्या नजीक बसलेले काही जण 2000 च्या नोटा मोजताना दिसून येतात.

चित्रफित समोर आल्याने पक्ष आणि आमदाराची मोठी फजिती झाली. आमदाराने लाच देण्याचा आरोप फेटाळला. पक्षाच्या कार्यक्रमासाठी 60 बसेसची व्यवस्था केली होती. बसमधून लोकांना कार्यक्रमस्थळी नेले जाईल अशी माहिती आमदाराने दिली.

चित्रफित चुकीच्या प्रकारे सादर करण्यात आली. कार्यक्रमात पोहोचणाऱया लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि वाहनांच्या इंधनासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा आमदाराने केला.

Related posts: