|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हाफिजसोबत आघाडी करण्यास मुशर्रफ तयार

हाफिजसोबत आघाडी करण्यास मुशर्रफ तयार 

इस्लामाबाद  / वृत्तसंस्था

पुढील वर्षी होणाऱया निवडणुकीत आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि 26/11 हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईद याच्यासोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे माजी सैन्य हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी केले. मुशर्रफ यांनी स्वतःला हाफिज तसेच लष्कर-ए-तोयबाचा सर्वात मोठा समर्थक ठरविले.

आतापर्यंत हाफिजसोबत बोलणी झाली नाहीत, परंतु हाफिज आघाडीत सामील होऊ इच्छित असेल तर त्याचे स्वागत करेन असे मुशर्रफ यानीं ‘आज’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मुशर्रफ यांनी मागील महिन्यात एका मोठय़ा आघाडीची घोषणा केली होती. यात सुन्नी तहरीक, मजलिस-ए-वहातुदुल मुसलमीन, पाकिस्तान अवामी तहरीक आणि ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगसमवेत जवळपास 24 पक्षांचा समावेश आहे. परंतु या आघाडीच्या दुसऱयाच दिवशी अनेक मोठय़ा सहकारी पक्षांनी यातून अंग काढून घेतले.

2018 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविणार अशी घोषणा हाफिज सईदने शनिवारी केली. जमातöउद-दावाने ऑगस्ट महिन्यात मिली मुस्लीम लीग या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याने सईदला अमेरिकेने 2008 साली दहशतवादी ठरविले होते. याचबरोबर हाफिजच्या विरोधात 1 कोटी डॉलर्सचे इनाम देखील घोषित केले होते.

Related posts: