|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » भारत सातव्या स्थानी

भारत सातव्या स्थानी 

वृत्तसंस्था/ मार्सेली

येथे झालेल्या डब्ल्यूएसएफ विश्व पुरूषांच्या सांघिक स्क्वॅश स्पर्धेत भारताने सातवे स्थान पटकाविले. रविवारी या स्पर्धेतील सातव्या आणि आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत भारताने स्कॉटलंडचा 2-1 असा पराभव केला.

भारताला हरवून न्यूझीलंडने सहावे स्थान मिळविले होते. पण स्कॉटलंडविरूद्ध भारताने बऱयापैकी कामगिरी करत विजय मिळविला. भारताच्या हरिदर पाल संधू आणि महेश माणगांवकर यांनी आपले सामने जिंकले तर विक्रम मल्होत्राला स्कॉटलंडच्या क्लेनीकडून हार पत्करावी लागली.

Related posts: