|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » क्रिडा » मँचेस्टर सिटी विजयी

मँचेस्टर सिटी विजयी 

वृत्तसंस्था/ लंडन

डेव्हिड सिल्वाच्या निर्णायक गोलाच्या जोरावर रविवारी येथे प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात मँचेस्टर सिटीने वेस्टहॅम युनायटेडचा 2-1 असा पराभव केला. या स्पर्धेतील मँचेस्टर सिटीचा हा सलग 13 वा विजय आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर सिटीने आपले अग्रस्थान कायम राखले असून नजीकच्या संघावर आठ गुणांची आघाडी घेतली आहे.

या सामन्यात खेळाच्या पूर्वार्धात अँजेलो ओगबोनाने हेडरद्वारे वेस्टहॅमचे खाते उघडले. 57 व्या मिनिटाला निकोलास ओटामेंडीने जिजसच्या पासवर मँचेस्टर सिटीला बरोबरी साधून दिली. 83 व्या मिनिटाला डेव्हिड सेल्वाने ब्रूनीच्या पासवर मँचेस्टर सिटीचा निर्णायक गोल केला.

Related posts: