|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » अर्जेंटिना-हॉलंड हॉकी लढत बरोबरीत

अर्जेंटिना-हॉलंड हॉकी लढत बरोबरीत 

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

येथे सुरू असलेल्या हॉकी विश्व फेडरेशनच्या हॉकी विश्व लीग अंतिम स्पर्धेतील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दोनवेळा पिछाडीवर राहूनही अर्जेंटिनाने युरोपियन चँम्पियन्स हॉलंडला 3-3 असे गोल बरोबरीत रोखले. या सामन्याला शौकिनांची खूपच गर्दी होती.

विद्यमान ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना आणि युरोपियन चॅम्पियन्स हॉलंड यांच्यातील हा दर्जेदार सामना जणु अंतिम लढतच असल्याचे जाणवले. या सामन्यात थियेरी ब्रिंकमनने 12 व्या मिनिटाला तर व्हॅलेटिन व्हेर्गाने 37 व्या मिनिटाला गोल नोंदविले. पण त्यानंतर पाच मिनिटांच्या कालावधीत मटायस रे याने 45 व्या तर लुकास व्हिलाने 50 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. हॉलंडचा प्रूसेरने तिसरा गोल केला. सामना संपण्यास 30 सेकंद बाकी असताना गेंझालो पिलेटने गोल नेंदविल्याने अर्जेंटिनाने हॉलंडला 3-3 असे बरोबरीत रोखले. या स्पर्धेत मंगळवारी हॉलंडचा सामना बेल्जियमशी तर अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होईल.

Related posts: