|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » कसोटीसाठी बुमराहची प्रथमच निवड

कसोटीसाठी बुमराहची प्रथमच निवड 

द.आफ्रिका दौऱयासाठी संघ घोषित, पार्थिव पटेल, हार्दिक पंडय़ाचेही पुनरागमन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया कसोटीसाठी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला प्रथमच संधी मिळाली असून हार्दिक पंडय़ा व यष्टिरक्षक पार्थिव पटेल यांनी कसोटी संघात पुनरागमन केले आहे. सोमवारी दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणाऱया कसोटी संघाची तसेच भारतात लंकेविरुद्ध होणाऱया टी-20 मालिकेसाठी संघांची निवड करण्यात आली.

17 सदस्यीय कसोटी संघात निवड समितीने सात फलंदाज, सात गोलंदाज, एक अष्टपैलू व दोन यष्टिरक्षकांची निवड केली. विराट कोहली या संघाचे नेतृत्व करणार असून 5 जानेवारीपासून या दौऱयाची सुरुवात होईल. अजिंक्मय रहाणेला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. 23 वषीय बुमराहने आतापर्यंत मर्यादित षटकांच्या सामन्यांतच खेळण्याची संधी मिळाली होती. पण आता दक्षिण आफ्रिका दौऱयात त्याला कसोटी पदार्पणाचीही संधी मिळणार आहे. त्याने 28 वनडे व 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.

याचवेळी निवड समितीने लंकेविरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघनिवड केली असून रोहित शर्माकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. कोहलीने विश्रांतीसाठी या मालिकेतून माघार घेतली असून 20 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

द.आफ्रिका दौऱयासाठी कसोटी संघ : कोहली (कर्णधार), मुरली विजय, राहुल, धवन, पुजारा, रहाणे (उपकर्णधार), आर. अश्विन, जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, बुमराह.

लंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, धोनी, हार्दिक पंडय़ा, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, बुमराह, मोहम्मद सिराज, बेसिल थांपी, जयदेव उनादकट.

Related posts: