|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नॅशनल स्कूल ऍकॅडमी इंग्लिश मीडीयम ठरले चॅम्पियन

नॅशनल स्कूल ऍकॅडमी इंग्लिश मीडीयम ठरले चॅम्पियन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

इंटरनॅशनल एज्युकेशन फौंडेशनतर्फे शाहू स्मारक भवन येथील आयोजित विंग ऑफ फायर उर्दू इंटरस्कूल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व, निबंध, नाथ, व चित्रकला आदी स्पर्धांचा सहभाग होता. शहरातील 7 उर्दू शाळेतील जवळपास 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. नॅशनल स्पूल ऍकॅडमी इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘चॅम्पियन ऑफ द एअर’ पारितोषिक पटकावले.  सर्वच कला प्रकारात पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले.

नॅशनल स्पूल ऍकॅडमी इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, नाटय़ स्पर्धा, निबंध, चित्रकला स्पर्धेत चांगले यश संपादन केले. त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावण्यात आले आहे. मैलाना आबुल कलाम आझाद स्कूलच्या विर्द्यांनी व्दितीय तर नेहरू हायस्कूलने तृतीय पारितोषिक मिळवले. या स्पर्धेत मुलांनी नाथ गायन स्पर्धेत अतीशय चांगले सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. परीक्षकांनी स्पर्धकांचे कौतुक केले.  बक्षीस वितरणचा कार्यक्रम संपल्यानंतर विजेत्या स्पर्धकांनी आनंद साजरा केला. 

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ताराबाई पार्क येथील शाखेचे प्रमुख आय. जी. शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. इम्रान नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सनोबर बागवान, डॉ. अशफाना नायकवडी, डॉ. रूबीना महाबरी, डॉ. रमीजा मनेर, डॉ. कुलसुम शेख, ऍड. शाहीन नवाब, डॉ. सदीया सय्यद या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मुस्लिम समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, पॅथॅलॉजीस्ट अशा शिक्षित लोकांनी एकत्र येऊन या स्पर्धांचे आयोजन केले होते. प्रास्ताविक सलीम बैरागदार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत डॉ. बद्रुदीन मणेर यांनी केले.  सुत्रसंचालन डॉ. जुबेर बागवान यांनी केले. समीर जमादार आभार मानले.  यावेळी  गणी आजरेकर, डॉ. शकील महाबरी, डॉ. नसरूद्दीन पटवेगार, शैकत मुजावर, बाबासो सरकवास, आयाज बागवान, समीर आर. बागवान, समीर मुजावर आदी उपस्थित होते.

Related posts: