|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इंडियन नेव्हीस अजिंक्मयपद

इंडियन नेव्हीस अजिंक्मयपद 

वार्ताहर/ घुणकी

 येथील निमंञीत राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबईच्या इंडियन नेव्हीने अजिंक्मयपद पटकाविले. त्यामुळे  बी.ई.जी.पुणेस उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  तर    तिसऱया क्रमांक सेंट्रल रेल्वेला मिळाला.

 येथील चॅलेंजर स्पोर्टस क्लब यांच्यावतीने व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने  सहाव्या वर्धापनदिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चषक निमंत्रितांच्या राष्ट्रीय  बास्केटबॉल स्पर्धा आज रात्री पार पडल्या. स्पर्धेचे संयोजक आणि  तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव यांच्या संयोजनाखाली स्पर्धा झाल्या. राज्याचे माजी मंत्री विनय कोरे, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यानी  खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या.

 अंतिम सामना मुंबईच्या इंडियन नेव्ही व पुण्याच्या बी.ई.जी. यांच्यात झाला. सुरवाती पासून मध्यतंरापर्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात नेव्हीने 7 गुणांची आघाडी घेतली होती. पण मध्यतंरानंतरही पुण्याच्या संघाने आघाडी कमी केल्याने चुरस कायम राहीली. त्यामुळे  प्रेक्षकांना खेळाचा आनंद लुटला. अखेर नेव्हीने 5 गुणांच्या  फरकाने सामना जिंकत नेव्हीने अजिंक्मयपद पटकाविले ले. पुणे संघास उपविजेतेपद मिळाले. तत्पूर्वी पहिल्या  उपांत्य सामन्यात इंडियन नेव्ही संघाने हैदराबादच्या कस्टमचा तब्बल 17 गुणानी (60-43) मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.  दुसऱया उपांत्य सामन्यात पुण्याच्या बी.ई.जी. संघाने सेंट्रल रेल्वे®ाा  14 गुणानी (65-51) पराभव केल्याने अंतिम फेरीत प्रवेश झाला.

  तिसऱया क्रमाकांसाठी झालेल्या सामन्यात सेंट्रल रेल्वेने हैद्राबादच्या 15 गुणानी (69-54) पराभव केल्याने सेंट्रलला तिसरा क्रमांक मिळाला. बेस्ट प्लेअर म्हणून  तन्मय माळी (पुणे) यास सन्मानित करण्यात आले.

  या स्पर्धा शिवाजी हायस्कूलच्या स्व. किसनबापू जाधव क्रीडांगणावर दिवस प्रकाश झोतात स्पर्धा  सुरु  होत्या.

 विजेत्या संघाना  रोख रक्कम व शिल्ड  देणगीदार वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आप्पासाहेब मोहिते, मुख्याध्यापक  सी. एस. शिर्के, प्रविण पाटील, डॉ. मिलींद हिरवे,  हेमंत मिसाळ, सरपंच अमरसिंह पाटील, सागर पाटील, वैभव व्हनागडे, सिध्दार्थ देसावळे, संपत सावंत, सचिन चव्हाण, संजय पाटील, शिवाजी सिद, राजेंद्र जाधव, मयूर पाटील, पी. आ. भोसले, रावसाहेब निकम, हातकणंगले तालुका ख. वि. संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, वारणेचे संचालक हिंदूराव तेली, राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे, अशोक जाधव, निवृत्ती शिंदे, प्रभाकर कुरणे, तानाजी जाधव, नामदेव जाधव, संभाजी पाटील, सुनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. चॅलेंजर स्पोर्टसच्या   कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच शरद बनसोडे, आकाश बनसोडे, मनोज कोटीयन, पँचो आचार्य यांनी काम पाहिले.

Related posts: