|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » व्हीलचेअर रेसमध्ये किशोरची तर धावणे स्पर्धेत ओंकारची बाजी

व्हीलचेअर रेसमध्ये किशोरची तर धावणे स्पर्धेत ओंकारची बाजी 

प्रतिनिधी / कोल्हापूर

दसरा चौक परिसरातील अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदानात आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत जिह्यातून 130 महिला व पुरुष दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेअंतर्गत विविध 8 क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिंकण्याच्या जिद्दीने या स्पर्धांमध्ये उतरलेल्या अनेक दिव्यांग खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन दाखवत दिव्यांगपणावर मात करण्यास आम्ही स्वतःच समर्थ आहोत, हेही दाखवून दिले. सर्वात लक्षवेधी ठरलेल्या 100 व्हिलचेअर रेस स्पर्धेत वेगवान कामगिरीच्या जोरावर किशोर गावडेने पहिला क्रमांक पटकावला. तसेच बुद्धीबळ स्पर्धेत अतिष पोळने आणि अंधांच्या 100 मीटर धावणे स्पर्धेत अंकुश तटकरेने पहिला क्रमांक पटकावला. तसेच अस्थिव्यंग मुलांच्या 100 मीटर धावणे स्पर्धेत ओंकार पागारने तर गतीमंद मुलांच्या 50 मीटर धावणे स्पर्धेत आकाश पोळने पहिला क्रमांक पटकावला.

  नगरसेवक संभाजी जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव बापूराव चौगुले, दत्तात्रय म्हामुलकर, संजय पाटील, राजु परिते, वसंत कांबळे, पांडूरंग देवणे, प्रदीप शिंदे, चेतन अनुशे, उमा पवार, मानसी माने, विलास मोरस्कर, सुधाकर पाटील, मिना आचरेकर, शोभा पाटील, शोभा सावंत, सुरेश टोपले, संजय ढेंगे, अजय वणकुंद्रे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या समारोपानंतर यशस्वी खेळाडूंना रोख सहा हजार रुपये, प्रमाणपत्र आणि चषक असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव, भरत चिंदगे, हिंडाल्को इंडस्ट्रीजचे दत्ता म्हसवेकर यांच्या हस्ते खेळाडूंनी बक्षीसे स्वीकारली. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य करणाऱया अपंग पुनर्वसन संस्थेला बळ मिळेल, अशी भरीव मदत केली जाईल, असे आश्वासन उद्योजक जाधव यांनी यावेळी दिले.

  विविध स्पर्धेतील अनुक्रमे पहिले तीन विजेते असे :

100 व्हीलचेअर रेस स्पर्धा : किशोर गावडे, सागर कातळे, शंकर देसाई. कॅरम स्पर्धा- चंद्रकांत सूर्यवंशी, ऐश्वर्या खोत, मयुरेश माजगांवकर. बुद्धीबळ स्पर्धा : अतिश पोळ, ऋषिकेश पांचागणे, ओंकार पाटील, रांगोळी स्पर्धा : वैशाली घोंगडे, मानसी माने, ऋतुजा पाटील, 100 मीटर धावणे (अंध मुले) : अंकुश तटकरे, अमित भिसे, माणिक भोसले. 100 मीटर धावणे (अस्थिव्यंग मुले) : ओंकार पागार, अक्षय बदामे, सुयश माने. लिंबू चमचा (अंध मुली) : अक्षता चौगुले, योगिता बोरगांवे, मंजिरी मर्दाने. 500 मीटर धावणे : आकाश पोळ, स्वप्निल साळोखे, ओंकार राणे.

Related posts: