|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वारकरी बांधवांनी व्यसनमुक्तीसाठी जागृती करावी – धनवडे

वारकरी बांधवांनी व्यसनमुक्तीसाठी जागृती करावी – धनवडे 

प्रतिनिधी/ विटा

सद्गुरू हभप विवेकानंद वासकर महाराज यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘दोन मने, दोन पाने’ या घोष वाक्याचा अवलंब करावा. प्रत्येक वारकरी बांधवांनी स्वतः निर्व्यसनी राहून दोन व्यक्ती व्यसनमुक्त कराव्यात आणि दोन झाडे लावून ती जगवावीत, असे आवाहन हभप विलास धनवडे यांनी केले.

रामापूर येथे पारायण सोहळा उत्साहात पार पडला. चोपदार हभप तुकाराम काकडे यांच्याहस्ते वीणापूजन करण्यात आले. वारकरी पायिक संघाचे गाव प्रमुख हभप विनोद सुर्यवंशी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हभप शिवाजी जाधव यांच्याहस्ते ग्रंथपूजन करण्यात आले, तर ध्वजपूजन हभप पांडुरंग जाधव यांनी केले.

पारायण सोहळा चंद्रभागा संगम सांप्रदायिक पारायण मंडळाचे अध्यक्ष हभप विलास धनवडे यांच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी धनवडे महाराज यांनी जगात कुठेही ग्रंथाची जयंती साजरी होत नाही. प्रत्येक गावी वारकरी बांधवांनी स्वतःच्या कुवतीप्रमाणे गीता जयंती साजरी करावी, असे आवाहन केले. यावेळी हभप तुकाराम माळी, हभप राम जाधव, हभप रोहित यादव, आनंदराव पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

Related posts: