|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आज वृक्षतोड विरोधात सांगलीत शिवसेनेच्यावतीने आंदोलन

आज वृक्षतोड विरोधात सांगलीत शिवसेनेच्यावतीने आंदोलन 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता माळी टॉकीज समोरील मोठा वृक्ष स्थानिक नगरसेवकाने तोडल्यामुळे माळी टॉकीज समोरील चौकात आज मंगळवार पाच नोव्हेंबर रोजी शहर शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली.

येथील माळी चित्रमंदीर चौकासमोर मोठा वृक्ष आहे. या वृक्षामुळे या परिसरात कोणतीच अडचण होत नव्हती. उलट उन्हाळयामध्ये या झाडाच्या सावलीत अनेक नागरिकांना विसावा घेता येत होता. मात्र महापालिकेची कोणतीही पुर्वसूचना न घेता स्थानिक नगरसेवकाने क्रेनच्या साहाय्याने हे झाड तोडून कर्नाटक येथील व्यापाराला त्याची लाकडे विकली आहेत. स्थानिक नागरिकांनी आयुक्तांना याबाबतचे पत्र देवूनही संबंधितावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शहर शिवसेनेच्यावतीने पर्यावरणाची हानी व महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे माळी चित्रमंदीर समोरील चौकामध्ये सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनात शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंडाळे यांनी केले आहे. 

Related posts: