|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरात खुदाई थांबणार कधी?

शहरात खुदाई थांबणार कधी? 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील रस्त्यांची अगोदरच दयनिय अवस्था झाली आहे. त्यामध्ये सातत्याने याच रस्त्यावर खुदाई होत असते. सोमवारीही शहरात अशीच खुदाई सुरु होती. ही खुदाई थांबणार कधी?, सातारकरांची त्यामधून सुटका होणार कधी?, असा सवाल साताकर विचारु लागले आहेत.

सातारा शहरात गेल्या तीन वर्षापूर्वी रस्ते केले होते. आता शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. पडलेल्या खड्डय़ामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता झाली आहे. त्यातच कधी पालिकेचा पाणी पुरवठा विभाग तर कधी एमएसईबीवाले तर कधी फोन कंपन्या असे सतत कोणाचे ना कोणाचे रस्त्याला उत्खनन सुरु असते. सोमवारीही शहरात राधिका चौकात पालिका कर्मचाऱयांकडून खुदाई सुरु होती. तर राजलक्ष्मी चित्रपटगृहाजवळही अशीच उकराउकरी दुपारी सुरु होती. त्यामुळे हे थांबणार कधी असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान, याबाबत पालिकेचे बांधकाम सभापती किशोर शिंदे यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद लागल्याने यावर उपाययोजना काय होणार हे समजू शकले नाही.

Related posts: