|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटा नाद… पालिकेत खलबत्ते

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटा नाद… पालिकेत खलबत्ते 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा नगरपालिकेच्या हद्दीत कचरा उचलण्यासाठी 40 घंटागाडी चालकांनी ठेका पध्दतीने कचरा उचलण्यासाठी दुसऱयाला ठेका दिल्याने कचरा उचलण्याचे काम बंद केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटागाडी चालकांनी जोरदार निदर्शने केली. राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 40 घंटागाडी चालकांनी मोर्चा काढला. चालकमालकांना कोणतीही नोटीस न देता ठेका काढून घेण्यात आला.

  सातारा शहरातील 40 घंटागाडी चालकांनी संप पुकारला. त्यामुळे नगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून संपकऱयांच्या दुखण्यावर मीठ चोळले. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणाबाजी देत सातारा नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेत 40 घंटागाडय़ा गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. या गाडय़ांना पालिकेने न्याय द्यावा. आम्ही गेले 16 वर्षे कचरा घरोघरी जावून गोळा करतो. चौदाव्या वित्त आयोगानुसार आलेला ठेका ठाण्यातील साशा या कंपनीस देण्यात आला आहे. या कंपनीने आम्हास कोणतीही समाधानकारक उत्तरे व कोणतीही लेखी करार न करता आम्हांस भाडे तत्वावर घेतले आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही कमी मोबदल्यात काम करत आहोत. नगरपालिका आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आम्ही तुमच्याकडे न्याय मागत आहोत.

यावेळी घंटागाडी चालक नितीन लावंगरे, मंगेश नामदास, शहजाद शेख, राजू नलवडे, दीपक बावधने यांच्यासह अन्य घंटागाडी चालक उपस्थित होते.

Related posts: