|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ज्योतिर्मय महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ

ज्योतिर्मय महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर व परिसरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू व मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी. महिलांना बचतगटांना चळवळीला प्राधान्य मिळावे या हेतूने गेल्या चार वर्षापासून सुरु केलेल्या ज्योतिर्मय फौंडेशनच्या महोत्सवाचे 8 पासून साताऱयात प्रारंभ होत आहे. त्याच्या मंडप उभारणीच्या कामाला रविवारी सायंकाळी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आल्याची माहिती सुवर्णादेवी पाटील यांनी दिली. दरम्यान, तसेच या एक्स्पोची माहिती देण्याची ऑडिओ क्लिपही तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

सातारा शहरात 200 हून अधिक महिला बचत गट आहेत. तसेच सातारा तालुक्यातही महिला बचतगटांची संख्या मोठी आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे जीवनमान उंचवावे, त्यासाठी महिला बचतगट कार्य करतात. त्यांच्या कार्याला साथ देण्यासाठी ज्योतिर्मय फौंडशन एक माध्यम म्हणून महिलांसाठी झटत आहे. यावर्षी या एक्स्पोमध्ये 200 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये महिला बचतगटांनी तयार केलेल्या घरगुती कुरडया, पापड यापासून ते विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत. खवय्यांसाठीही खास स्टॉल्स असून सातारा शहरवासियांसाठी ही संधी आहे. या एक्स्पोच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ कार्यकारिणीच्या सदस्या स्मिता शिंगटे, निर्मला पाटील, ऍड. अंजूम मणेर, राजश्री दोशी, सईदा नदाफ, मल्लीका पुजारी, सीमा भाटीया, दिप्ती पवार, रेणुका शेटे, नीलम रजपुत, राधिका पाटील आणि सुवर्णा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

Related posts: