|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पेन्शनधारकांची आधार लिंकसाठी झुंबड

पेन्शनधारकांची आधार लिंकसाठी झुंबड 

वार्ताहर / पट्टणकुडी

शासनाच्या आदेशानुसार विविध खात्यांना आधार जोडणीचे काम सर्वत्र चालू आहे. आता पेन्शनधारकांनीही आधार लिंक करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तहसीलदारांच्या आदेशानुसार पट्टणकुडीतही हा उपक्रम राबविला जात असल्याने पेन्शनधारकांनी ग्रामपंचायत आवारात गर्दी केली आहे. शासनाने वयोवृद्ध, अपंग, विधवा तसेच इतर सर्वच पेन्शनधारकांनीही आपल्या खात्यांशी आधारलिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात तलाठी कार्यालयामार्फत याचे काम सुरू आहे. रविवारपासून हा कार्यक्रम सुरू असून मंगळवारपर्यंत याला मुदत देण्यात आली आहे. ज्या पेन्शनधारकांचे आपल्या खात्याशी आधारलिंक नाही त्यांनीच याठिकाणी आधार जोडणी करून घ्यावी. त्यासंबंधित पेन्शनधारकांच्या नावाची यादी याठिकाणी लावण्यात आली असल्याचे ग्रामसहाय्यक विलास नाईक यांनी सांगितले. या उपक्रमामुळे वयोवृद्ध, अपंग, विधवा यांनी मात्र याठिकाणी झुंबड उडवली आहे.

Related posts: