|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महसूल वसुली रेंगाळल्याने अडचणी

महसूल वसुली रेंगाळल्याने अडचणी 

@ प्रतिनिधी / बेळगाव

घरपट्टी आणि इतर महसूल वसुलीसाठी महापालिकेकडे वसुली क्लार्कची कमतरता होती. त्यामुळे एकाचवेळी 21 वसुली क्लार्कची नियुक्ती करण्यात आली. तरीदेखील महसूल वसुलीत कोणतीच प्रगती झाली नाही. महापालिकेच्या खजिन्यात ठणठणाट असून 35 कोटी घरपट्टीपैकी आतापर्यंत 25 कोटीचा महसूल वसूल करण्यात आला आहे. महसूल वसुली रेंगाळल्याने मनपासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

महसूल वसुली थंडावली असल्याने महापालिकेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी विकासकामे राबविण्यास अडचण निर्माण झाली आहे. यंदा 35 कोटीची घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. पण यापैकी आतापर्यंत 25 कोटी 40 लाखाची घरपट्टी वसूल केली आहे. तसेच महापालिकेच्या गाळय़ांच्या भाडय़ाच्या माध्यमातून दीड कोटीचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. पण आतापर्यंत केवळ 60 लाखाचा महसूल वसूल करण्यात आला आहे. 

भू-भाडे वसुली, रेशनकार्ड सर्वेक्षण, घरपट्टी वसुली, जनगणती, मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण, अनधिकृत जाहिरात फलक हटविणे आदीसह विविध कामे महसूल विभागातील कर्मचाऱयांवर सोपविण्यात येत असल्याने महसूल वसुलीवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत होते. अशातच वसुली क्लार्कच्या 28 जागा रिक्त असल्याचे कारणही देण्यात येत होते. पण दोन महिन्यांपूर्वी नगरविकास खात्याने 21 वसुली क्लार्कची नियुक्ती केली आहे. तरीही महसूल वसुलीत कोणतीच वाढ झाली नाही. वसुली झाली नसल्याने विकासकामे रखडली आहेत.

Related posts: