|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अखेर बारा घुसखोर बांगलादेशच्या ताब्यात

अखेर बारा घुसखोर बांगलादेशच्या ताब्यात 

प्रतिनिधी / बेळगाव

सहा महिन्यांपूर्वी बेळगाव येथे अटक करण्यात आलेल्या बारा बांगला घुसखोरांच्या तडीपारीची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. अंतर्गत सुरक्षा विभागाच्या अधिकाऱयांनी घुसखोरांना बांगला प्रशासनाकडे सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अधिकारी बेळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.

अंतर्गत सुरक्षा विभागाचे पोलीस उपअधिक्षक महांमेश्वर जिद्दी व त्यांच्या सहकाऱयांनी बांगला घुसखोरांना बेळगावहून रेल्वेने कोलकाताला नेले होते. कोलकाताहून हे अधिकारी सोमवारी सायंकाळी बांगलादेशाच्या सीमेवर पोहोचले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बेळगावात अटक करण्यात आलेल्या एका महिलेसह बारा घुसखोरांना बांगलादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

2 मे 2017 रोजी विमानाने दुबईला जाण्याच्या प्रयत्नात असणाऱया महम्मदअलअमीन शौफिकउद्दीन बेपारी (वय 26, रा. ढाका, बांगलादेश) याला पुणे विमानतळावर अटक झाली होती. तो बांगलादेशी असल्याचे तपासात उघडकीस येताच पुणे पोलिसांनी 5 मे 2017 रोजी बेळगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बेळगाव पोलिसांनीही त्याची कसून चौकशी केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरुन बेळगाव परिसरात बांगला घुसखोरांची धरपकड केली होती.

महम्मदअलअमीनने दिलेल्या माहितीवरून हाबीबूररेहमान अब्दुलरौफ हलसाना (वय 37, रा. चौरपाडा, पोस्ट इन्साफनगर, ठाणा दौलतपूर, जि. कुस्टीया विभाग-खुलना बांगलादेश, सध्या रा. रेणूकानगर,बेळगाव), राकीबहुसेन अलीहुसेन मुरल (वय 20, रा. राजाहरचोर, पोस्ट कोवासपुर, ठाणा मादरीपूर, ढाका बांगलादेश, सध्या रा. रामतीर्थनगर), इक्रामहुसेन अबुलकहरे (वय 22, रा. कुवासपूर, ढाका-बांगलादेश, सध्या रा. आटोनगर), महम्मदमामुन महमदखालीक मुल्ला (वय 29, रा. बिक्रमपूर, हायरपूर, पोस्ट मंचर, ठाणा तंगबरे, जि. मुनसीगौस, बांगलादेश, सध्या रा. रामतीर्थनगर), इब्राहिमशौकत याकुबइसुब मात्तुबरखान (वय 24, रा. जिगुरहट्टी, पोस्ट गौटमाजी, ठाणा मादरीपूर, ढाका-बांगलादेश, सध्या रा. आमाननगर), अब्दुलहाय निहारअलीगाजी (वय 60, रा. नियोदा,पोस्ट आझादनगर, ठाणा शामनगर, जि. शातकिरा), रोहानशेख मिंटू शेख (वय 21, रा. कुवासपूर टेकर, ठाणा मादरीपूर, जि. मादरीपूर), हण्णन्शद्दार हमीतशद्दार (वय 21, रा. हबीपूर, पोस्ट नूरनगर, ठाणा शामनगर, जि. शातकिरा), अकीब अलीहुसेन (वय 20, रा. तेवलीचौरापारा, पोस्ट नकुनकुला, ठाणा बंदूर, जि. नारंगौंच), हाफीउद्दलइस्लाम मोनाइस्लाम (वय 20, रा. मालीग्राम, पोस्ट कवालीबारा, ठाणा स्वादरपूर, जि. फरीपूर), श्रीमती अंजुमबेग मधू (वय 37, रा. बेनापूर, ठाणा बेनापूर, जि. चहशहर), रोहानशेख मिंटूशेख (वय 21 रा. माद्रिपूर बांगलादेश) यांना अटक करण्यात आली होती.

जिल्हा प्रशासनाने गृहखात्याच्या माध्यमातून या कारवाईची माहिती नवी दिल्ली येथील बांगला दुतावासाला दिली होती. तीन महिन्यांपूर्वी या माहितीची खातरजमा करुन घेण्यासाठी दुतावासातील वरि÷ अधिकाऱयांनी बेळगाव व विजापूरला भेट दिली होती. कारण विजापूर येथील दर्गा कारागृहातही बांगला घुसखोरांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. दुतावासातील अधिकाऱयांनी खात्री करून घेतल्यानंतर हद्दपारीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागली होती.

Related posts: