|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी रयतेला तारले

शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी रयतेला तारले 

देसूरमध्ये शिवपुतळ्य़ाच्या उद्घाटनप्रसंगी नितीन बानुगडे यांचे प्रतिपादन

वार्ताहर / मजगाव

350 वर्षांपूर्वी शिवरायांनी हे केलं की रयतेच्या डोईवर छत्र ठेवलं. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबाला असे घडविले की शेतकऱयांच्या बळावर शिवरायांनी राज्य केले. शिवरायानी स्वतःच्या राज्याला स्वतःचे नाव नाही ठेवले. त्यांनी ‘स्वराज्य’ असे नाव ठेवले. स्वराज्यात कोणतीही गोष्ट करायची असेल तर पहिला मनात नंतर प्रत्यक्षात उतरायचे, अशी त्यांची राज्यनिती होती.

अशा अनेक उदाहरणांसह शिवव्याख्याने महाराष्ट्रातील प्राध्यापक नितीन बानुगडे यांनी देसूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्य़ाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते या नावाने उद्गार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवप्रतिष्ठान मंडळ देसूरचे अध्यक्ष होते. यावेळी अश्वारुढ शिवमूर्तीचे उद्घाटन येथील उद्योजक अप्पासाहेब भरमाण्णा गुरव यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले.

सोमवारी पहाटे 5 वा. शिवप्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्त्यांनी राजहंसगडावरून शिवज्योत आणली. यावेळी गडावरील महादेव मंदिरात अभिषेक करून आरती म्हणून शिवज्योत घोडय़ावरून आणण्यात आली. यावेळी राजहंसगड गावातही शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. तसेच म्हैसूर गावामध्येही जल्लोशात स्वागत करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी आप्पासाहेब गुरव, रमेश नाईक, रमेश पाटील, सीपीआय ग्रामीणचे नारायणस्वामी नारायण पाटील, जि. पं. सदस्य रमेश गोरल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्यावेळी प्रकाश सर्वो, अनंत पाटील, मष्णू पाटील, प्रभाकर पाटील, अजित देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गणेश फोटो पूजन जि. पं. सदस्य रमेश गोरल, सातेरी माऊली फोटो पूजन रमेश नंद्याळकर, हनुमान फोटो पूजन राजाभाऊ खन्नूकर, लक्ष्मी फोटो पूजन हणमंत रामजी चव्हाण, ज्ञानेश्वर माऊली फोटो पूजन बाबाजी पाटील, सरस्वती फोटो पूजन एएसआय वडगाव पोलीस स्टेशनचे शिवाजी एस. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

मान्यवरांचा सत्कार

यावेळी सत्कार मूर्ती स्वातंत्र्य सैनिक मल्लाप्पा आरगू, अभियंता एम. एम. मुतकेकर, गवंडी मेस्त्री अनंत गुरव, सेंट्रींग मेस्त्री रमेश गुरव व मूर्तीकार संजय किल्लेकर यांच्या मान्यवरांच्याहस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी तुरमुरी येथील ढोल-ताशा पथकाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. देसूरमध्ये संपूर्ण गावभर भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे भगवेमय वातावरण होते.

शिवमूर्तीच्या उद्घाटन प्रसंगी आकर्षक आतषबाजी करण्यात आली व शिवरायांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा देसूर शिवप्रतिष्ठान मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते प्रा. नितीन बानुगडे यांचाही सत्कार करण्यात आला.

सुरुवातीला देसूर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी शिवरायांचे गीत गायिले. यावेळी आजी-माजी ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ, परिसरातील शेकडो युवाकार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. डी. पाटील यांनी केले तर वाय. एम. व्हंडेकर यांनी आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts: