|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » लाचखोर लिपिकाला 4 वर्ष सक्तमजुरी

लाचखोर लिपिकाला 4 वर्ष सक्तमजुरी 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

माजी सैनिकाच्या मुलाकडे त्यांच्या आईचे नाव वारसदार म्हणून नोंदवण्याकामी प्रमाणपत्र देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत 4 वर्ष सक्तमजुरी व 5 हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावल़ी

सुरेश नारायण चव्हाण (44, ऱा शासकीय वसाहत, आरोग्य मंदिर) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. त्यांना 15 नोव्हेंबर 2014 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 5 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होत़े त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंघक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा

या प्रकरणातील तक्रारदार यांचे वडील लष्करामधील नोकरीतून निवृत्त झाले असल्याने त्यांच्या नावे पेन्शन सुरू होत़ी दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांची पेन्शन त्यांच्या पत्नीच्या नावे करावी, यासाठी त्यांच्या मुलाने जिल्हा कोषागार कार्यालय येथे अर्ज केला होत़ा यावेळी आईचे नावे पेन्शन का सुरू झाली नाही, याची त्यांनी चौकशी केली असत़ा तेथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले सुरेश चव्हाण यांनी वारसदार म्हणून तुमच्या आईचे नाव रजिस्टर नसल्याने तुम्हाला न्यायालयात ते सिद्ध करावे लागेल. यासाठी तुम्हाला 3 वर्षापेक्षा अधिक काळ थांबावे लागू शकते, असे सांगितल़े तुम्हांला जर लवकर काम करायचे असेल तर 10 हजार रूपये द्या, आपण साहेबांशी बोलून तुमचे काम करतो, असे चव्हाण यांनी सांगितल़े यावर तक्रारदार यांनी या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यासाठी लाचलुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण उंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचल़ा

त्यानुसार 14 नोव्हेंबर 2014 रोजी चव्हाण यांच्याशी तक्रारदार यांनी फोनवरून संभाषण केल़े 10 हजार देणे शक्य नसून 5 हजार रूपये देण्यावर तडजोड केल़ी यावर चव्हाण यांनी उद्या कार्यालयात पैसे घेवून या. तुम्हाला वारसदाराचे प्रमाणपत्र देतो, असे सांगितल़े ठरल्याप्रमाणे 15 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार हे पोहोचले असता त्यांच्याकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चव्हाण यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होत़े या प्रकरणी सोमवारी प्रधान जिल्हा व विशेष न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी चव्हाण यांना दोषी मानून 4 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रूपयाचा दंड ठोठावला आह़े यामध्ये एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे ऍड. विनय गांधी यांनी काम पाहिल़े

Related posts: